अडचणीत आलेल्या कर्जदारांना सवलती द्या, भारतीय बँक संघटनेनेची मागणी

मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेली असामान्य स्थिती लक्षात घेऊन कर्जदाराचे कर्ज ‘बॅड लोन’ श्रेणीत टाकण्याचा कालावधी ९० दिवसांवरून वाढवून १८० दिवस करा, अशी मागणी भारतीय बँक संघटनेने केली रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.

कर्जासाठी तारण मालमत्तांवरील कारवाईची किमान तीन महिने पुढे ढकला, कर्जफेडीबाबतची मुदत निघून गेलेले कर्ज खातेही सामान्य किंवा सामान्य पुनर्गठन अंतर्गत ग्राह्य धरा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

कर्जाच्या सर्व खात्यांचे पुनर्गठन करा आणि कोरोनाच्या साथीमुळे जी कर्जखाती गोत्यात आली आहेत त्यांच्यासाठी ‘विशिष्ट मुदत कर्जा’चे पॅकेज द्या, अशीही मागणी आहे.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरसोबत बँकांच्या झालेल्या बैठकीत अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, रिझर्व्ह बँकेने २७ मार्च २०२० ला सर्व बँकांना कर्ज खात्यांच्या हप्त्यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचे अधिकार दिले आहेत. याचप्रमाणे २९ फेब्रुवारीला ज्या कर्ज खात्यांची मुदत संपली होती त्या खात्यांच्या वर्गीकरणाची प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवा, असे निर्देश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला