बँकांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित

मुंबई :- सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेला तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी ११ ते १३ मार्च या कालावधीत हा संप पुकारण्यात आला होता. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केल्याने संप स्थगित केल्याची घोषणा आज शनिवारी ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने केली. या घोषणेमुळे ग्राहकांची होणारी गैरसोय टळली आहे.

आज मुंबईत बँकेच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात चर्चा झाली. सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रस्तावित संप स्थगित करीत असल्याचे इंडियन बँक असोसिएशनचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचेलम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.