रिलायन्सचे मुख्यालय बँक घेणार ताब्यात; अनिल अंबानींना दणका

Anil Ambani

मुंबई : कर्जाच्या परतफेडीसाठी ‘येस बँके’नं (YES Bank) अनिल अंबानी(Anil Ambani) यांच्या मुंबईतील(Mumbai) सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी ‘नोटीस ऑफ पझेशन’ पाठवले आहे. या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या इतर दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर सर्व बँकांचे १२ हजार कोटी रुपये कर्ज आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला बँकेने २ हजार ८९२ कोटी रुपये कर्ज दिले होते. येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँकेने रिलायन्सची(Reliance) नागीन महल येथील दोन कार्यालयेही आपल्या अधिकारात घेतली आहेत. डिफॉल्टर्सचे असेट्स ताब्यात घेऊन त्याची विक्री करण्याचा अधिकार बँकांना आहे. सध्या येस बँकदेखील संकटात आहे. बँकेवर मोठ्या प्रमाणात ‘बॅड लोन’चे ओझे आहे. ते कमी करण्याचे प्रयत्न बँक करते आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावरही बँकांचं १२ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. कारवाई करण्यापूर्वी बँकेनं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाला ६० दिवसांची नोटीस पाठवली होती. ती मुदत ५ मे रोजी संपली. कंपनीकडून कर्जाची रक्कम अदा होऊ शकली नाही. दरम्यान, संपत्ती विकावी लागली तरी बँकांचे सर्व कर्ज फेडणार, असे अंबानी यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER