मार्च महिन्यात १९ दिवस बँक बंद

Bank closed for 19 days in March

नवी दिल्ली : मार्च महिन्यात मोठे आर्थिक व्यवहार करायचे आसतील तर बँकांच्या सुट्ट्या लक्षात ठेवा कारण मार्च महिन्यात बँक १९ दिवस बंद राहणार आहे.

दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि होळी अशा १६ सुट्ट्या आणि ११ ते १३ मार्च ३ दिवस बँकांचा संप आहे. सुट्ट्यामध्ये मात्र काही सुट्ट्या या राज्य पातळीवरच्या आहेत.

पगारात २५ टक्के वाढ व्हावी हि बँक कर्मचाऱ्यांची मागणी मंजूर न झाल्याने ११ ते १३ मार्च संपाची हाक देण्यात आली आहे.

सुट्ट्यांची यादी –

* १ मार्च : रविवार
* ५ मार्च : (ओडिशा) पंचायती राज्य दिवस
* ६ मार्च : (मिझोरम) चपचर कूट
* ८ मार्च : रविवार
* ९ मार्च : (उत्तर प्रदेश) हजरत अली जन्म दिन
* १० मार्च : (ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम) डोलयात्रा / (महाराष्ट्र) होळी
* १४ मार्च : दुसरा शनिवार
* १५ मार्च : रविवार
* २२ मार्च : रविवार
* २३ मार्च : (हरयाणा) भगतसिंग शहीद दिवस
* २५ मार्च : (कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र) गुढीपाडवा / मणिपूर, जम्मू-काश्मीर
* २६ मार्च : (गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड) चेट्रीचंड
* २७ मार्च : (झारखंड) सरहुल
* २८ मार्च : चौथा शनिवार
* २९ मार्च : रविवार