महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वालंबी करणारे वसंतराव नाईकसुद्धा बंजारा समाजातून येतात !

Banjara communitys Vasantrao Naik

पुजा चव्हाण आत्महत्ये (Pooja Chavan Case) प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला. त्यांच्यावर आरोप होत असताना ते बरेच दिवस नॉट रिचेबल होते. ते माध्यमांसमोर आले पण त्याआधी त्यांनी बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या वाशिमच्या पोहरादेवीच दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समर्थाथ हजारो बंजारा महिला आणि पुरुष जमले होते. गंभीर आरोप असताना ते बंजारा समाजाचा वापर ढाल म्हणून वापर करत असल्याचे आरोप झाले. तर दुसऱ्या बाजूला पाठराखण केल्याबद्दल सोशल मिडीयावर बंजारा समाजाला (Banjara community) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.

पण याच बंजारा समाजातील एका नेत्यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेला स्वावलंबन प्राप्त झालं. हे सुद्धा विसरुन चालणार नाही. “महाराष्ट्र दोन वर्षात अन्नधान्याच्या उत्पादनात बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाहीतर मी फासावर जाईन.” ही घोषणा त्यांनी भर सभेत केली आणि निवडणूकीतल्या आश्वासनासारखं या घोषणेला विसरुन न जाता ही गोष्ट सत्यात उतरवली. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर सर्वाधिक काळ राहिलेल्या बंजारा नेत्याची गोष्ट.

वसंतराव नाईक यांच्या आजोबांनी चतरसिंग यांनी यवतमाळच्या पुसदमध्ये बंजारांच्या तांडा वसवला. त्यामुळं चतुरसिंग राठोड हे तांड्यांचे नेतृत्व करणारे नायक असल्यामुळं त्यांना नाईक ही उपाधी मिळाली. पुढं हेच त्यांचं आडनाव झालं. भटका बंजारा समाज स्थिरवला, शेती करु लागला. याचे श्रेय चतुरसिंग नाईक यांना जातं. चतुरसिंगाना फुलसिंग हा मुलगा झाला आणि त्यांच्या पोटी जन्मले राजूसिंग आणि हाजूसिंग. हाजूसिंग म्हणजेच वसंतराव नाईक १ जूलै १९१३चा त्यांचा जन्म.

शेतीचा हाच वारसा पुढं वसंतरावांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नेला आणि अन्नधान्यांच्या बाबतीत परावलंबी महाराष्ट्राला स्वावलंबी केलं.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ ते विराजमान होते. नेमेकपणानं सांगायच तर ११ वर्ष, २ महिने, १५ दिवस. वसंतरावांच्या राजकीय कौशल्याचेच हे उदाहरण म्हणावे लागले. इतका काळ सलग मुख्यमंत्री राहण्याची तारेवरची कसरत यशस्वी करु शकले ते फक्त वसंतराव नाईकच.

१९७२ च्या दुष्काळावर केली मात

चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका या देशांचे दौरे करुन वसंतराव नाईकांनी शेतीपिकांच्या संकरीत वाणांची महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ओळख करुन दिली. शेतकरी नगदी पिकं पिकवू लागले. उस आणि कापसाचे जसे उत्पन्न वाढले तसे महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणायाला त्यांनी सुरुवात केली. नगदी पिकं पिकू लागली आणि कारखान्यांकडून तो माल खरेदी होऊ लागला आणि शेतकऱ्यांच्या हातात मुबलक पैसा आला. यात वसंतराव नाईकांचं मोठं योगदान आहे.

रोजगार हमी योजनेचा पाया रचला

१९७२ च्या दुष्काळानंतर सलग ३ वर्षे पाऊस पडला नाही. अशा परिस्थीत नागरिकांवर अन्न धान्याचं मोठ संकट उभं राहिलं तेव्हा वसंतरावांनी देशातली पहिली रोजगार हमी योजना सुरु करण्याच धाडसं केलं. ती योजना यशस्वीपणे राबवली देखील. त्यांच्या या निर्णयामुळं सात हजारांच्यावर विहिरी मिळाल्या. मध्यम धरणे, छोटे कालवे खोदण्याचं काम केलं आणि ५० लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला.

शिवसेना की वसंतसेना, बाळासाहेब आणि वसंतराव नाईक

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिलेले वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. सहकारी संस्था पाठीशी नसताना विदर्भातील एका बंजारा कुटुंबातील व्यक्तीनं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सलग बारा वर्ष संभाळलं. असं करणारे ते पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री.बाळासाहेबांचे आणि वसंतराव नाईकांचे चांगले संबंध होते. “महाराष्ट्राला आदर्श राज्य करुन दाखऊ अशी इच्छा बाळगणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत.” अशा शब्दात त्यांनी वसंतरावांच कौतूक केलं होतं.

एकेकाळी मुबंई डाव्यांचा गड मानली जायची. त्याला खिंडार पाडण्यासाठी वसंतराव नाईक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला छुपा पाठिंबा देताहेत. असे आरोप व्हायचे. शिवसेनेला वसंतसेना ही म्हणलं जायचं.

आणि पाय उतार होण्याचा निर्णय घेतला

महाराष्ट्राच राजकारण संभाळताना त्यांना यशवंराव चव्हाण आणि इंदिरा गांधी दोघांचं समर्थन टिकवून ठेवणं जमलं पण जसं जसं वय वाढत गेलं तसं त्यांच पक्षावरील नियंत्रण कमी होत गेलं. ७२ च्या विधानसभेत त्यांनी काँग्रेसची सत्ता आणली खरी पण २० बंडखोर आमदार निवडूण आले होते. पोट निवडणूकीत ही त्यांना तडाखा बसला.

राजकारणावरील निसटती पकड ध्यानात घेऊन ते मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार झाले. पुढं १८ ऑगस्ट १९७९ ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER