बांगलादेशही आपल्याला सीमा बंद केल्याचं सांगतो; राज ठाकरे केंद्रावर संतापले

Raj Thackeray

मुंबई :- करोना (Corona) संकट हाताळण्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रावर सडकून टीका केली. बांगलादेशही आपल्याला सीमा बंद केल्याचं सांगतो! असा संताप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रावर व्यक्त केला.

एका मुलाखतीत ते म्हणालेत की, यांच्याकडून येणारी माणस आम्ही पोसायची आणि हे संकटात तुम्हाला सीमा बंद असल्याचे सांगणार! त्यांनी सीमा उघडली तरी जाणार कोण हा प्रश्नच आहे. पण याप्रकारे आपल्या देशाची नाचक्की व्हावी यासारखे दुर्दैव नाही. आपण धडा नाही घेतला. निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो.

भारतात जाऊ नका असे चित्र जगात निर्माण झाले आहे. बांगलादेशने आपल्याला बॉर्डर बंद केल्याचे सांगावे! बांगलादेशच्या सीमेवरुन हजारो लोक आपल्याकडे आले. त्यांना आपल्याला अजून काढता येत नाही तो भाग वेगळाच. पण तो देश भारतासाठी सीमा बंद आहे सांगतो!

कोरोनाबाबत ते म्हणालेत की, हे जे काही जगावर संकट आलं त्याची कोणालाच कल्पना नव्हती. फक्त आपणच चुकीच्या अंगाने हाताळल असे नाही, अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले पण आपण अजूनही आलो नाही.

ही बातमी पण वाचा : ठाकरे बंधू एकत्र येणार ? प्रश्नाच्या उत्तरात राज म्हणालेत …

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button