कोहली आणि पडिकक्कल यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर बंगळुरूने राजस्थानला ८ गडी राखून नमवले

Virat Kohli - Devdutt Padikkal

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १३ व्या सत्रातील १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) ८ गडी राखून मोठा विजय नोंदविला. कर्णधार कोहली (Kohli) आणि देवदत्त पडिकक्कलने (Devdutt Padikkal) अर्धशतके झळकावली.

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राचा १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अबूधाबीच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत राजस्थान संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १५४ धावा केल्या. राजस्थानने बंगळुरूला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल बंगळुरूने कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर देवदत्त पडिकक्कलच्या अर्धशतकाच्या मदतीने १९.१ षटकांत दोन गडी गमावून १५८ धावा केल्या आणि सामना जिंकला.

आरसीबीचा रॉयल विजय पॉइंट टेबलमध्ये शीर्ष स्थानावर

युवा फलंदाज देवदत्त पडिकक्कल (६३) आणि कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद (७२) अर्धशतकी खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सला केवळ २ विकेट्सने पराभूत केले नाही तर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. आरसीबीचा चार सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER