बंद यशस्वी, मात्र कुणावरही जबरदस्ती नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला असून आम्ही या बंदसाठी कुणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. तथापि, जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आणि ३५ संघटना मिळून हा बंद जाहीर करण्यात आला होता. त्याला १०० संघटनांनीदेखील पाठिंबा दिला होता. बंद दरम्यान अमरावतीत पकडलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडून दिले. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आंबेडकर म्हणाले.

घाटकोपरला बसवर दगड मारणारा तोंडाला रुमाल बांधून होता. तो कोण आहे याचा पोलीस तपास करत आहेत. पालघरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने जबरदस्ती दुकान उघडण्यास भाग पाडले, अशी माहिती त्यांनी दिली. बंद दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्यांची संख्या तीन ते सव्वातीन हजार आहे. मुंबई ठप्प पडली हा दावा फेल गेलेला नाही. यासाठी आम्हाला कुणालाही जबरदस्ती करायची नव्हती, असेही आंबेडकर म्हणाले.

सदाभाऊसारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे लक्ष देत नाही : राजू शेट्टी