समुद्र आणि नदीकिनारी छटपूजेला बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली

Chhatpuja

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) साथीमुळे मुंबई महापालिकेने मुंबईत समुद्र किंवा नदीच्या काठावर छटपूजा आणि या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. पालिकेने त्याबाबतची नियमावलीच आज जारी केली आहे. (bmc bans Chhath puja celebrations in mumbai)

छटपूजा उत्सव २० व २१ नोव्हेंबर रोजी आहे. छटपूजेच्या उत्सवानिमित्त निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नागरिक समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने येत असतात. यंदा कोरोनासाथीची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने मनपाने छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर बंदी टाकली आहे.

मात्र, नागरिकांच्या सोईसाठी सबंधित संस्थांना छोट्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक परवानग्या महापालिकेच्या विभागस्तरावरुन देण्यात येतील. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा विविध सण साजरे करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे इत्यादीबाबत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळी देखील करावे आणि बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER