रझा अकादमीवर बंदी घाला – अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar

मुंबई :- फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईत उमटले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात पायदळी तुडवण्यात आले.

हे फोटो तुडवले जावेत म्हणून रझा अकादमीने रस्त्यावर चिकटवले होते. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी याबाबत ठाकरे सरकारवर टीका केली असून रझा अकादमीवर बंदी टाकण्याची मागणी केली आहे.

भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. फ्रान्सच्या नीस शहरात कुराण हातात घेऊन चर्चमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांनी तिघांची निर्घृण हत्या केली. काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांचे व्यंग्यचित्र दाखवल्याने फ्रान्समध्ये शाळेच्या एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी धर्मांध मुस्लिमांबाबत कडक धोरण अवलंबवले आहे. रझा अकादमीने मुंबईच्या रस्त्यांवर त्यांचे चित्र चिकटवून तुडवले व त्यांचा निषेध केला.

रझा अकादमीच्या या निषेधाबाबत भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. ‘मुंबईतील भेंडी बाजार येथे फ्रान्सच्या राष्टध्यक्षांचे फोटो रस्त्यांवर चिकटवून भ्याड निदर्शने करणाऱ्या रझा अकादमीचे कृत्य देशद्रोही स्वरूपाचेच आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भातखळकरांनी केली आहे. सोबतच रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवावी, असे आव्हान सरकारला दिले.

शिवसेनेची भूमिका काय?

फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कडक शब्दात निषेध केला आहे. आज चीनकडून होत असलेल्या कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतासोबत फ्रान्स खांद्याला खांदा लावून उभा आहे. अशा वेळी फ्रान्सच्या अध्यक्षांविरुद्ध महाराष्ट्रात रझा अकादमीचे लोक निदर्शने करत आहेत. याविषयी शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे. चीनमध्ये इतके दिवस मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना रझा अकादमी गप्प का? असाही प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER