छटपूजेमध्येही निर्माल्य बंदी करा : मनसे

Chhatpuja-MNS

ठाणे : १३ नोव्हेंबर रोजी छटपूजा आहे. मात्र, यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ‘गणेशोत्सवात निर्माल्य नेण्यास बंदी असते, तशीच बंदी छटपूजेमध्येही करावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल,’ असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. ‘फक्त मराठी सणांवरच नियमांची जबरदस्ती का?’ असा प्रश्नही मनसे कडून विचारण्यात आला आहे.

छटपूजा उपवन, तलावपाळी किंवा अन्य तलावांच्या काठी केली जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात हार, फुलं आणि इतर साहित्य वापरलं जातं. मात्र पूजा झाल्यानंतर हे निर्माल्य तेथेच तलावाच्या काठी सोडून दिले जाते. यानंतर हे निर्माल्य कुजून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

दरम्यान, छटपूजा हा उत्सव उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नेपाळ अशा भारतातील पूर्व भागात साजरा केला जातो.मात्र, आता बदलत्या काळाबरोबर तसेच, उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर छटपूजा करण्यात येते.