द्रवरूप प्राणवायूच्या औद्योगिक वापरावर बंदी

Industry With use of liquid oxygen Are ban - Maharastra Today
Industry With use of liquid oxygen Are ban - Maharastra Today

नवी दिल्ली : प्रकृती गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांसाठी प्राणवायूची तीव्र टंचाई जाणवत असल्याने केंद्र सरकारने द्रवरूप प्राणवायूच्या औद्योगिक वापरावर देशभर संपूर्ण बंदी लागू केली आहे. ही बंदी रविवारच्या रात्रीपासून लागू झाली असून ती पुढील आदेश होईपर्यंत सुरु राहील.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे अधिकार वापरून हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून तो कळविला आहे. याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने २२ एप्रिल रोजी प्राणवायूच्या औद्योगिक वापरावर निर्बंध आणले होते. तरीही पोलाद, पेट्रोलियम यासारख्या नऊ उद्योगाना द्रवरूप प्राणवायू वापरण्याची मुभा होती. परंतु आता कोणत्याही उद्योगांना मुभा असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय गृह सचिवांनी राज्यांना असे आदेश दिले आहेत की, द्रवरूप प्राणवायू वैद्यकीय वापराखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जाणार नाही, याची राज्यांनी पुरेपूर खात्री करावी तसेच कारखान्यांकडे असलेले द्रवरूप प्राणवायूचे साठेही वैदद्यकीय उपयोगासाठी ताब्यात घ्यावे. शिवाय उत्पादकांना प्राणवायू उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button