‘टुलकिट’ भाजपावर उलटले म्हणून सोशल मीडियावर ‘बंदी’ची हालचाल; सामनातून टीका

Sanjay Raut-PM Modi-Maharashtra Today

ट्विटरसह इतर सोशल मीडिया कंपन्यांसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली आणली आहे. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद पडतात की, काय अशीही भीती व्यक्त करत सामनाच्या ‘रोखठोक’(Rokhtok)मधून भाजपावर टीका करण्यात आली की, २०१४ पासून २०१९ पर्यंत याच माध्यमांचा वापर करून भारतीय जनता पक्षाने विरोधकांना नामोहरम केले. डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर यथेच्छ चिखलफेक करण्यासाठी याच माध्यमांचा वापर केला. आज त्याच माध्यमांचे ‘टुलकिट’(Toolkit) भाजपावर उलटले आहे त्यामुळे सोशल मीडियावर ‘बंदी’ (Ban)घालण्याची हालचाल केंद्र सरकारने(Center Govt) सुरू केली.

फेसबुकवर नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची ‘करोना’(Corona) हाताळणीसंदर्भात बदनामी होते आहे, असे सांगणे म्हणजे काळाने त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ व राहुल गांधी यांना ‘पप्पू’ ठरविण्यासाठी २०१४ साली भाजपाने याच माध्यमांचा वापर केला,” असा आरोप संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केला.

“आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली, वृत्तपत्रांवर बंधने आणली, अग्रलेखांवर चौकी, पहारे बसविले. स्पष्ट बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबले. त्याच इंदिरा गांधींना पराभवानंतर शहा कमिशनसमोर जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य व प्रतिष्ठा अडचणीत आल्याचा युक्तिवाद केला. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, ”माझी प्रतिष्ठा हा घटनेच्या २९ व्या कलमानुसार माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे आणि तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही. तसेच कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीखेरीज अन्य तऱ्हेने माझी बदनामी होईल अशी कार्यपद्धती स्वीकारता येणार नाही.”ज्यांनी आणीबाणी जाहीर करून सर्वांचे व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट केले (असा विरोधकांचा आरोप) त्यांनाच व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आपले समर्थन करणे आणि शहा आयोगावर आक्षेप घेणे भाग पडावे ही दैवाची विचित्र लीलाच होती. तेच दैव भाजपाच्या नशिबी आले. अशी टीका राऊत यांनी केली आहे.

काँग्रेसने काय केले?

“या सगळ्या प्रकरणात ‘टुलकिट’ हा नवा शब्द सामान्यांच्या कानावर पडला. हे टुलकिट नावाचे प्रकरण नक्की काय आहे याचे कोडे तरीही अनेकांना पडले असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेसने एक ‘टुलकिट’ निर्माण केले. म्हणजे एक यादी केली होती. पंतप्रधान मोदी, करोना लढ्यातील सरकारचे अपयश याबाबत कोणी काय लिहायचे, कधी कोणत्या वेळेस काय बोलायचे, कोणत्या माध्यमांवर काय बोलायचे, याबाबतची ‘कामे’ वाटून देणारी एक यादी काँग्रेसने केली होती, असा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला.
मोदींनी प्रतिष्ठा दिली

“टुलकिट प्रकरणानंतर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांच्या नाड्या आवळण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. ‘ट्विटर’चे मुख्यालय अमेरिकेत आहे व ते भारतातील कायदा मानत नाहीत. आपल्या देशाची नियमावली ते मानायला तयार नाहीत. भारताचा कायदा, ‘सायबर लॉ’ या माध्यमांना मान्य करावाच लागेल. नाहीतर दुकाने बंद करा असे आता केंद्राने बजावले आहे, पण देशात सर्वप्रथम ‘ट्विटर’सारख्या माध्यमांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती नरेंद्र मोदी यांनीच. जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ‘ट्विटर’ अकाऊंट सुरू केले व केंद्रातील सर्व मंत्र्यांना ‘ट्विटर’वर सक्रिय राहण्याचे सुचवले. मोदींचे मत म्हणजेच ‘ट्विटर’ असे एक नातेच निर्माण झाले. मोदींना विश्वगुरू वगैरे बनविण्यात ‘ट्विटर’सह इतर समाजमाध्यमांचा वाटा मोठा आहे. ‘ट्विटर’वर सगळ्यात जास्त लोकप्रिय कोण? मोदी की डोनाल्ड ट्रम्प? या स्पर्धेने ‘ट्विटर’ला महत्त्व मिळाले, पण ‘ट्विटर’चा वापर खोट्या बातम्या, अफवा प्रसिद्धीसाठी होत असल्याच्या तक्रारी होताच ‘ट्विटर’ने ट्रम्प यांचे खातेच बंद केले. भारतात कंगना राणावतला याच खोटारडेपणाचा फटका बसला व तिचे खातेही बंद केले. आता मोदींचे सरकार ‘ट्विटर’सह सगळ्याच सोशल मीडियावर बंदी घालायला निघाले आहे. यालाच म्हणतात, ‘कालाय तस्मै नमः’ उत्तर कोरियातील हुकूमशहा किंम जोंग याने त्याच्या देशात ‘ट्विटर’ वगैरेंवर बंदीच घातली. चीनसारख्या राष्ट्रातही ते नाही. आता मोदींच्या देशातही ‘सोशल माध्यमां’वर बंदी येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button