बांबूची बॅट चालणार नाही !

Bamboo Bat not permissible

जगभरातील क्रिकेटच्या नियमांचे (Cricket Rules) अधिकृत नियमन करणाऱ्या मेरिलेबोन क्रिकेट क्लब (MCC) ने बांबूची बॅट (Bamboo Bat). चालणार नसल्याचे स्पष्ट केले असून तशी बॅट वापरल्यास ते अवैध ठरेल असे म्हटले आहे. मात्र यासंदर्भात कायदा उपसमितीच्या बैठकीत एमसीसी विचार करणार आहे.

केंब्रिज विद्यापीठातील दर्शील शहा व बेन टिंकलर डेव्हीस यांच्या संशोधनानुसार बांबूपासून बनवलेल्या बॅट किफायती तर असतीलच शिवाय त्या पारंपरिक विलो लाकडापासून बनविलेल्या बॅटपेक्षाही मजबूत राहतील असा दावा करण्यात आला होता.

सद्यस्थितीत नियम 5.3.2 नियमानुसार क्रिकेटच्या बॅटचे पाते हे केवळ लाकडापासूनच बनलेले असावे. मात्र बांबू हे गवत आहे आणि गवताच्या बॅट वापरण्यासाठी नियमांत बदल करावे लागतील. बांबूला लाकूड जरी मानले तरी नियमात बदल करावे लागतील कारण बॅटच्या पात्याला लॕमिनेशन करायची परवानगी नाही आणि बांबूची बॅट वापरायची झाली तर लॕमिनेशन करावेच लागेल. सध्या ज्युनियर क्रिकेटच्या बॕटींनाच लॕमिनेशनची परवानगी आहे.

शहा व डेव्हिस यांच्या संशोधनानुसार बांबूपासून बनवलेल्या बॅट ह्या पारंपारिक विलो बॅटपेक्षा टणक, मजबूत आणि कडक असतात पण त्या विलो बॅटपेक्षा ठिसूळ असतील. बांबूच्या बॅटचा स्वीट स्पॉट (जेथून चेंडू अधिक जोरात फटकावला जातो) मोठाआणि बॅटच्या तळाकडे असतो. त्यामुळे याॕर्करवरही चौकार मारणे आणि इतर फटके लगावणेही सोपे होणार असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button