बॅलेट पेपर की ईव्हीएम ? भाजपमध्येच संभ्रम

मुंबई : पुन्हा एकदा आता मतपत्रिका की ईव्हीएम (EVM) हा मुद्दा चर्चेत आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा अशी भूमिका मांडली त्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तर, याबाबत 2014च्या भाजप लाटेनंतर मतपत्रिकेचा साफ नकार दर्श्वणारे भाजपमध्ये (BJP) आता मतपत्रिका का ईव्हीएम याबाबत संभ्रंम दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील मतदारांना विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा पर्याय मिळावा म्हणून महाराष्‍ट्र विधानमंडळाने कायदा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. नाना पटोलेंच्या या भूमिकेवर भाजप नेते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निवडणूक कोणत्या पद्धतीनं घ्यावं हा निवडणूक आयोगाचा प्रश्न असल्याचं सांगितलयं तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला आहे.

प्रविण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले-

विधानसभा आण विधानसभा अध्यक्षांनी काय करावं हे नियम घालून देण्यात आलेले आहेत.निवडणूक हा विषय केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असतो. आपला देश सुधारणेकडे जाणारा आहे. त्यामुळं मतपत्रिकेवरुन आपण ईव्हीएम आणलं. आता उलटा प्रवास करण्याचा प्रयत्न दिसतोय. नियम सर्वांना सारखे असतात, सरकारं येतात आणि जातात. त्यामुळे पूर्वग्रहानं भूमिका घेऊ नये. भाजपला देशभरात यश मिळतं आहे. विरोधी पक्ष त्यांचं अपयश लपवण्यासाठी अशा भूमिका घेत आहे. देश प्रगतीकडं जात असताना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे, अशी भूमिका प्रविण दरेकरांनी मांडली.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सावध भूमिका घेतली –

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या विषयावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. या विषयी आपण अभ्यास करून बोलू अशी सावध भूमिका घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER