‘ईव्हीएम’सह मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध !

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) महाराष्ट्रातील मतदारांना ‘ईव्हीएम’व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. यासंबंधीचा कायदा महाराष्‍ट्र विधानमंडळाने करावा, अशा प्रकारच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. नागपूरचे रहिवासी प्रदीप उके यांनी या संदर्भाचे निवेदन विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे.

मुंबईतील विधान भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव उपस्थित होते. राज्यातील मतदारांना ‘ईव्हीएम’व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा विकल्प मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे.

‘मतपत्रिका’ अथवा ‘ईव्हीएम’ यापैकी कोणते माध्यम अधिक विश्वासार्ह आहे, हे जनतेला ठरवू द्या, असे मत याचिकाकर्ते सतीश उके यांनी व्यक्त केले. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२८ नुसार राज्यातील निवडणुकांबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधिमंडळाला आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER