चेंडू उजव्या हातात आणि स्टम्पिंग डाव्या हाताने, काउंटी क्रिकेटमध्ये नवा वाद

Ball right hand and stumping left hand - maharastra today

क्रिकेटमध्ये विवादांची काही कमी नाही. एक शमत नाही तोच दुसरा सुरु होतो. फखर झमानला दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने धावबाद केल्याचा वाद शमत नाही तोच मोईन अलीवर तस्लिमा नसरीन यांनी केलेल्या टिप्पणीचा वाद पेटला. आता तो शांत होत नाही तोच इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) हसन आझाद (Hasan Azaad) याला लुईस मॕकमानूस (Lewis McManus) याने स्टम्पिंग(Stumping) केल्याचा वाद पेटला आहे. हॕम्पशायरच्या मॕकमानूसविरोधात लिसेस्टरशायरने इंग्लंड क्रिकेट मंडळाकडे तक्रारसुध्दा केली आहे.

हा सामना हॕम्पशायरने चौथ्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळातच जिंकला पण या निकालावर लुईस मॕकमानूसने तिसऱ्या दिवशी केलेल्या वादग्रस्त स्टम्पिंगच्या निकालाची छाया राहिली.

लिसेस्टरशायरचा सलामी फलंदाज हसन आझदची त्याने स्टम्पिंग केली होती पण त्यावेळी चेंडू मॕकमानूसच्या अपिल करण्यासाठी उंचावलेल्या उजव्या हातात होता आणि दुसऱ्या हाताने म्हणजे डाव्या हाताने त्याने बेल्स उडवल्या होत्या. स्पष्टपणे ही कृती नियमबाह्य होती.

लिसेस्टरशायरने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि इंग्लंड क्रिकेट मंडळ हा प्रकार गंभीरतेने घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मंडळाच्या प्रवक्त्याने म्हटलेय की या प्रकाराबाबत सामन्याठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची त्यांना प्रतिक्षा आहे.

हॕम्पशायरचा कर्णधार जेम्स व्हिन्स म्हणाला की, सामन्यात त्यांच्या खेळाडूंना हा प्रकार लक्षात आला नाही पण ते लक्षात आले असते तर त्यांनी आझादला परत बोलावले असते. लुईसलाही हा प्रकार लक्षात आला नाही. सामन्यानंतर मॕच रेफ्री दोन्ही कर्णधारांशी बोलले आणि त्याबाबत अधिकृतरित्या मंडळाला कळवले जाईल असे म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button