मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही शब्द; बळीराजा थेट ‘मातोश्री’वर धडक देणार

Baliraja will directly hit CM Uddhav Thackeray's residence 'Matoshri'

मुंबई :- बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी एका शेतकऱ्यानं सांगली ते मुंबई बैलगाडी ओढत पदयात्रा काढली आहे. बैलगाडीमध्ये प्रतीकात्मक बैलाचं पार्थिव घेऊन हा बळीराजा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी निवासस्थान ‘मातोश्री’वर धडक देणार आहे.

सामजिक कार्यकर्ते विजय जाधव (रा.इस्लामपूर, जि.सांगली) यांनी ही यात्रा काढली आहे. हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामीण भागात बैलगाडी शर्यतीचं प्रचंड आकर्षण आहे. मात्र, मुंबई हायकोर्टानं (Mumbai Highcourt) २०११ मध्ये बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाडी शर्यती बंद झाल्या झाल्यानं नागरिक नाराज झाले आहेत.

बैलगाडीवरील शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आतापर्यंत राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी वारंवार मागणी केली. मात्र, सरकारकडून या मागण्यांकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत आता विजय जाधव यांनी थेट अनवाणी पायानं बैलगाडी ओढत सांगली ते मुंबई पदयात्रा काढली आहे.

ही बातमी पण वाचा : .. म्हणुनच मंदिराचे दार उघडले!! – नितेश राणेंचा ठाकरे सरकारला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER