मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांचे डाळ-कांदा फेकून आंदोलन

मुंबई: शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा आणि तूर डाळ विक्रीचा वाद चांगलाच पेटला आहे. यावर आक्रमक पवित्र घेत बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांचे डाळ-कांदा फेकून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कर्जमाफी, शेतकऱ्यांकडील पूर्ण तुरीची खरेदी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले . तुरीची डाळ, कांदे आणि केळी फेकून आंदोलकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. हे आंदोलन चिघळण्या अगोदरच दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले

दिवसेंदिवस कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे. कर्जबाजारीपणा त्यात महाराष्ट्रात पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे पिकांचे नुकसान यामुळे संकटात आला आहे. मात्र याकडे राज्यशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी भावना शेतकरी संघटनांकडून होत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अद्यापही चुप्पी साधली आहे. यावं विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेने मंत्रालयाच्या आवारात डाळ, कांदा फेकून रोष व्यक्त केला.