बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्ती मिळणार नाही; श्रीहरी अणे यांची टीका

- गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेबांचे नाव देण्याला विदर्भवाद्यांचा विरोध

Sreehari Ane

नागपूर : प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यात आले. याला विदर्भवाद्यांनी विरोध केला आहे. वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचे नेते, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यावर बोचरी टीका करताना म्हणालेत, यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळणार नाही. विदर्भात शिवसेना (Shivsena) आपले पाय रोवू शकत नाही. त्यामुळे हे नाव देण्यात आले आहे.

विदर्भात गोंडाचं ६०० वर्षं राज्य होतं. ही गोंडांची राजधानी होती. गोंड हे इथले मूळचे होते. इंग्रजांच्या आधीपासून या प्रदेशाला गोंडवाना म्हटले जायचे. याला ऐतिहासिक वारसा आहे. हे नाव बदलून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव देता. हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेचा अजेंडा चालवण्यासाठी आहे. त्यांना या भूमीत पाय रोवता येत नाहीत, याची शिवसेनेला पूर्ण कल्पना आहे. नावं बदलून लोकांच्या मनात परिवर्तन होणार नाही. विदर्भवाद्यांचा आवाज हा दाबण्यात येणार हे नवीन नाही. हे अपेक्षित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER