बाळासाहेबांच्या सुपुत्राला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही – संजय राऊत

CM Thackeray-Sanjay raut

मुंबई : राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. “हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला  कोणती दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?” असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारला. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यपालांनी राज्य सरकार घटनेनुसार राज्यकारभार चालवतायेत की नाही, याकडे लक्ष घालावे.

अनलॉकची प्रक्रिया करत असताना सर्व बाबींचा विचार केला जातो. त्यानुसार मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री निर्णय घेत आहेत. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाबद्दल विचारू नये. ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला अशा  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे ते पुत्र आहेत. शिवसेनेचा आत्मा हिंदुत्व आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कोणाकडूनही हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे जोरदार उत्तर राऊत (sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER