बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंतचे भावनिक उद्गार

Arvind Sawant

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार विविध मुद्यांवरून अडचणीत सापडले आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती. याप्रकरणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

राज्यातील भाजप खासदारांसह अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप करत महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी थेट लोकसभेत बोलताना केली होती. संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

यासंदर्भात अरविंद सावंत यांनी देखील लोकसभेत आपली बाजू मांडली आहे. ‘माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक आपल्यासमोर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाला अपमानित केलं नाही, कुणासाठी अपमानित शब्दाचा प्रयोगही केला नाही. त्यामुळे, आता याप्रकरणी मीच चौकशीची मागणी करतोय, असे भावनिक उद्गार त्यांनी काल लोकसभेत बोलताना काढले आहेत. यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER