नवी मुंबई विमानतळासाठी बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला; संजय राऊतांची स्पष्टोक्ती

Sanjay Raut - Balasaheb Thackeray

धुळे :- नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नावरून स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. आज भिवंडीत सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत भव्य मानवी साखळी आंदोलन करून स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलन केले. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेला आहे. दि. बा. पाटील यांच्यासाठी स्वतंत्र काही केले पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

दरम्यान, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावे. कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत, विशेष लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे. चंद्रकांत पाटील अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आणि निष्कपट आहेत. लहान मूल कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा असतो, अशा शब्दांत राऊत यांनी फिरकी घेतली.

तसेच चंद्रकांत पाटील यांच्या ‘आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही’ या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना काय आहे, कोण वाघ आहे हे देशाने बघितले आहे. या वाघांची जातकुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाहून कळतंच. या वाघानं तुम्हा सगळ्यांना खेळवलं आणि लोळवलंसुद्धा आहे. शिवसेना आजही प्रखर हिंदुत्ववादी आहे. सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button