नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव! एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

Eknath Shinde - Balasaheb Thackeray

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन आता राजकारण तापू लागले आहे. एकीकडे राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील नागरिकांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उचलून धरली आहे. यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलं आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती शिंदे दिली.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यापूर्वी कोणाकडूनही नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव आला नव्हता. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने तयार करुन राज्य सरकारकडे पाठवला आहे. आम्हाला दि. बा. पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एखाद्या नव्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सूचवावे, असं शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना हा विश्वासपात्र पक्ष असल्याचे प्रशस्तीपत्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. त्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना हा नेहमीच विश्वासहार्य पक्ष म्हणून राहिला आहे. शब्द पाळणं ही आमची परंपरा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावर हा पक्ष चालत आहे. त्यामुळेच पवारांनी शिवसेनेचे कौतुक केले असतील, असं म्हणत शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button