बाळासाहेबांचा समृतीदिन 17 नोव्हेंबरला शिवतिर्थावर गर्दी करू नका, संयम पाळा ; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Uddhav Thackeray - Balasaheb Thackeray

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा 17 नोव्हेंबरला स्मृतीदिन. राज्यभरातील शिवैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शिवतिर्थावर जमा होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना आपल्या भावनांना मनाच्या कप्प्यात ठेवून संयम पाळावा लागणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणदिनी येत्या 17 नोव्हेंबरला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी करू नये, संयम पाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी येथे केले.

शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून असंख्य हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर उसळतो. मात्र सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. तुमच्या भावना आणि श्रद्धा मी समजू शकतो. पण या वेळेस संयम पाळावा लागेल. कुणीही गर्दी करू नये. शिवसेनाप्रमुखांचे तुम्हा सर्वांच्या हृदयातील स्थान मला ठाऊक आहे. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर येऊन त्यांना मानवंदना द्यावी ही प्रत्येकाचीच भावना आहे. पण माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे… तुम्ही जेथे आहात तेथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या. शिस्त आणि नियमांचे पालन करा, हीच त्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER