
मुंबई :- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९५ वी जयंती. यानिमित सर्वच स्तरांवरून बाळासाहेबांना अभिवादन केलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थित खासदार अरविंद सावंत यांनीदेखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (Sitaram Thackeray) यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न या आंदोलनात बाळासाहेबांनी नेतृत्वाची परिसीमा गाठली. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय आणि समाजकारणात चैतन्य फुलविणारे बाळासाहेब लेखक, पत्रकार, व्यंग्यचित्रकार, परखड वक्ते, मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते, असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्त्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 23, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला