बाळासाहेब विखेंनी सत्तेसाठी तडजोड केली नाही – राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil-Balasaheb vikhe patil

अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांनी वडील व दिवंगत नेते यांच्याविषयी गौरवोद्गार भाषण करताना त्यांच्या कार्याविषयी सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील, नेहमी तत्त्वाने वागले. त्यांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही. तसेच परिणामांचा विचार न करता, तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले.

राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या राजकीय तसेच सामाजिक प्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं बाळासाहेब विखेंचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचं हेच स्वप्न पुढे घेऊन जाण्याचं काम युती सकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून फडणवीसांनी राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम केलं.”

बाळासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित घटकाच्या कल्याणासाठी समर्पित केलं. शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. तसेच सहकाराबद्दल बोलताना त्यांनी, सहकाराचं रोपटं बाळासाहेबांनीच लावलं असून त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER