औषध पुरवठ्याबाबत नगर जिल्ह्यासोबत दुजाभाव; बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Balasaheb Thorat-CM Uddhav Thackeray

मुंबई : सध्या राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणा हव्या त्या गरज भागविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच ठाकरे सरकारामधले राजस्व मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून आरोग्य सुविधा पुरवण्यात अनियमितता असल्याचे सांगत घरचा अहेर दिला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यात मी नुकताच तालुकानिहाय दौरा केला. त्यामुळे स्थानिक पातळीवरील माहिती मला त्या त्या तालुक्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना समजली. संशयित रुग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान २४ ते ४८ तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. अनेक तालुक्यांमध्ये रॅपीड ॲन्टीजन टेस्ट कीट ही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णाच्या चाचण्या न झाल्याने, रुग्णाच्या संख्येत घट दिसून येते. मात्र तशी वस्तुस्थिती नाही. करोना पॉझिटिव्ह आलेले ८५ टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधे सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांना द्यावयाची साधी साधी औषधेसुद्धा (पॅरासिटॅमॉल, सिट्राझिन, झिंक, अझिट्रॉमायसिन, फॅबिफ्लू) शासकीय रुग्णालये / कोविड केअर सेंटर येथे आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावून त्यांना पुढील उपचार देणे (ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन इत्यादी) गरजेचे ठरते. तरी सदर औषधे उपलब्ध होण्याबाबत आवश्यक ती पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर एचआर-सीटी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. पर्यायाने स्कॅनिंग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणेसुद्धा रुग्णवाढीचे कारण ठरत आहेत.

रुग्णालयात दाखल करताना डॉक्टर या एचआर-सीटीच्या रिपोर्टचा आग्रह धरतात. याबाबत डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय एचआर-सीटी न करणे व आवश्यकता नसताना एचआर-सीटी करायला न लावणे, याबाबत धोरण ठरविणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना आवश्यकता नसतानाही रेमडेसिवीर इंजेक्शन आणायला लावतात. याबाबतही राज्यस्तरावर रेमडेसिवीर वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे आवश्यक असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button