मी राजीनामा दिलेला नाही, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat.jpg

मुंबई :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा असतानाच आपण राजीनामा दिलेला नसल्याची माहिती खुद्द थोरात यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा जोरात सुरू आहे. तसंच प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांची नावंही समोर आली आहेत.

मंत्रिपदासह आपल्यावर तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपणच पक्षश्रेष्ठींशी बोलून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवल्याचेही थोरात यांनी सांगितले. तसेच तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असंही पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे थोरात म्हणाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असेल हे आपण सांगू शकत नसल्याचेही थोरातांनी म्हटले.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर बाळासाहेब थोरात नाराज आहेत. त्या नाराजीतूनच बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत बोलताना एच. के. पाटील यांच्याविरोधात कुठलीही नाराजी नाही. तसेच आपल्यावर कुणी नाराज होण्याचेही काहीच कारण नसल्याचे थोरात यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : राजकारणातली मोठी बातमी;  बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER