बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार; सोनिया गांधींच्या पत्रावर चर्चा होण्याची शक्यता

Uddhav Thackeray & balasaehb Thorat

मुंबई :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आज दुपारी ३ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असून, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचं पत्रही बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करणार आहेत.

बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, माजी मंत्री नसीम खान, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी मंत्री चंद्रकांत  हंडोरे उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस नेत्यांकडून ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी या भेटीत येत्या मुंबई महापालिका निवडणुकीची खलबतं होण्याची शक्यता आहे. या भेटीत मनपाच्या २२७ जागांवर एकत्र निवडणूक लढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय. तसेच या भेटीनंतर भाजपविरोधात महाविकास आघाडी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

ही बातमी पण वाचा : उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही; फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा ;  भाजप नेत्याचा सल्ला  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER