सीएए, एनआरसीवरून बाळासाहेब थोरात घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

CM Uddhav Thackeray - Balasaheb Thorat

मुंबई : सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरून महाआघाडीत धुसफूस सुरू असतानाच आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भात तसेच विरोधी पक्ष भाजपाच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून यात उपरोक्त तिन्ही मुद्यांवर काँग्रेच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शेतकरी कर्जमाफी, सावरकरांचा अपमान, जलयुक्त शिवार आदिंबाबत सरकारला जाब विचारू : फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी ते निर्णय घेतले. त्यांना फार आनंद झाला आहे. आमचे त्यावर काही वेगळे मत आहे. आम्ही त्यावर चर्चा करू. कदाचित त्यांनी याबाबत स्वतंत्रपणे काही निर्णय घेतले असतील. मात्र आम्ही त्यांना काही पटवून दिले तर ते याबाबत विचारही करू शकतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.