महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडा; बाळासाहेब थोरातांनी गोयलांना फटकारले

Balasaheb Thorat slams Piyush Goyal

मुंबई : कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार (Thackeray Govt) हे निर्लज्ज राजकारण करत आहे. देशातील सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असा सल्ला केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना दिला. पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे खडेबोल बाळासाहेब थोरात यांनी सुनावले.

बाळासाहेब थोरात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पीयूष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “आम्ही ऑक्सिजनची मागणी कमी करावी, म्हणजे नक्की काय करावे, हे त्यांनी सांगावे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आम्हाला कळलेला नाही. पीयूष गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. आम्हाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे; पण सरकार आम्हाला अपेक्षित मदत करत नाही. त्यामुळे सरकार अन्याय करत आहे.” असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात जाणे अयोग्य आहे. राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. आम्ही लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निर्यातबंदी झाल्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन्स एखाद्या पक्षाला नव्हे, तर राज्य सरकारला मिळायला हवी होती.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button