
मुंबई : औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) नामकरण करण्याला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यालयाच्या (CMO) ट्विटर अकाउंटवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख करण्यात आला.
औरंगाबादच्या नामकरणाला कडाडून विरोध करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली आहे. मालकीण इटालियन असल्याचे परिणाम दुसरं काय?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 7, 2021
या मुद्द्यावरून काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी फेसबुक पोस्ट करत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे, असे स्पष्ट केले. थोरात म्हणालेत, महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे.
आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून काँग्रेसला टोमणा मारला – औरंगाबादच्या नामकरणाला कडाडून विरोध करून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली आहे. मालकीण इटालियन असल्याचे परिणाम दुसरे काय?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला