अमित शहा-शरद पवार भेटीवर बाळासाहेब थोरात म्हणाले…

Amit Shah - Balasaheb Thorat - Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या अहमदाबादमधील भेटीने राजकीय वातावरणात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. या दरम्यान या घडामोडींवर काँग्रेसकडून (Congress) पहिली प्रतिक्रिया आली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एका वृत्तवाहिनीशी यासंबंधी प्रतिक्रिया दिली. ते  म्हणाले की, “अशा बातम्यांना आम्ही फार महत्त्व देत नाही. राष्ट्रवादीनेदेखील यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. रात्रीच मी पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनीदेखील मुद्दामहून हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत असल्याचं सांगितलं. त्यांना भेटायचे असते तर दिल्लीत सर्वांची घरं आहेत तिथेही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं वेगळं काही असेल असे मला वाटत नाही.

विरोधी पक्ष काही खडे टाकण्यात यशस्वी होतो आणि मीडियाकडून तो विषय उचलला जातो. वस्तुस्थिती वेगळी असते आणि मीडियामध्ये वेगळं सुरू  असतं.” असेही यावेळी ते म्हणाले.

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पवारांनी यूपीएचं नेतृत्व करण्यासंबंधीच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “यूपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच (Sonia Gandhi) करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. अवघड दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही. ”

“संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करू नये. ” असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

“अशा वक्तव्यामुळे नाराजी होत असते. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतात तेव्हा यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटक पक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध असून  भेद निर्माण करण्याची काही गरज नाही, असेही थोरात म्हणाले.

ही बातमी पण वाचा : अमित शहा – शरद पवारांची  भेट झाली ; पत्रकार  स्वाती चतुर्वेदीचा दावा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button