उपमुख्यमंत्रीपदावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया , म्हणाले ‘आनंदी आनंद गडे!

Balasaheb Thorat

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठोपाठ आणखी एक उपमुख्यमंत्री पद निर्माण केले जाणार असून ते काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ‘आनंदी आनंद गडे!’ (Anandi anand gade) अशी सूचक प्रतिक्रिया दिली. यासोबतच हे पद काँग्रेसच्या पदरी पडणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत .

संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार ( Surjyotsna awards 2021) सोहळ्यास राज्यातील मान्यवर मंत्री उपस्थित होते. या वेळी मंत्री थोरात यांना उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले, राजकारणात अशा चर्चा होतच असतात. कोणतेही पद दुय्यम असते, पण जनतेच्या सेवेसाठी ते महत्त्वाचे असते. आम्ही समाधानी आहोत, असेही थोरात यांनी सांगितले. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही उपमुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. ते म्हणाले, राजकारणात ज्या चर्चा होतात ते प्रत्यक्षात होतेच असे नाही. उपमुख्यमंत्री पद काँग्रेसला मिळेलच असे काही नाही, अशा शब्दांत त्यांनी ही चर्चा फेटाळल्या आहेत .

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER