राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांची टीका

Balasaheb Thorat and Radhakrishna Vikhe-Patil

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे .राज्यातील कोरोनाची स्थिती, लसींचा तुटवडा, ऑक्सिजन व बेड्सची कमतरता यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधला . यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विखे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. ते पत्रकारांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काय आरोप केले त्याला महत्त्व देत नाही. ते त्यांची आरोप करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाचा संसर्ग केवळ एकट्या नगरमध्येच नाही तर सर्वत्र हीच परिस्थिती आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही, असे थोरात म्हणाले.

राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृत्यूंची संख्या वाढते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button