शिवसेनेला काँग्रेसने करून दिली खास आठवण ; राऊत-फडणवीस भेटीवर दिली प्रतिक्रिया

Balasaheb Thorat & Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वातावरणात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत . त्यांच्या या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली .

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. राजकारणामध्ये इतर पक्षांच्या नेत्यांसोबत अशा भेटी होत असतात. दीपिका पदुकोणने चहा बिस्कीट खाल्ले अशा बातम्यांना जितके महत्त्व दिले जात आहे. तितकेच महत्त्व या भेटीला आहे. त्यामुळे या भेटीला माध्यमांनी फार महत्व देवू नये, असे थोरात म्हणाले.

शिवसेना ही भाजपसोबत अनेक वर्षांपासून सोबत होती. मागील सरकारमध्येही शिवसेना भाजपसोबत होती. मागील सरकारमध्ये पाच वर्ष कशी वागणूक भाजपने दिली हे त्यांना चांगलेच माहिती आहे’, अशी आठवणच थोरात यांनी सेनेला करून दिली. ‘संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे कोणतेची समीकरण तयार होणार नाही. महाविकास आघाडी सरकारला कसला ही धोका नाही’, असा दावाही थोरातांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER