मुस्लिमांना आरक्षण मिळावे हीच काँग्रेसची भूमिका – बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat-Muslims education Reservation

मुंबई : शुक्रवारी विधानसभेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आगामी शैक्षणिक सत्रात मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबतची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसही याबाबत आग्रही असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विधान परिषदेत नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत आघाडी सरकारची सकारात्मक भूमिका मांडली. यापूर्वीच राज्यात आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी शुक्रवारी विधान भवनाला भेट दिली होती. यावेळी महाविकास आघाडी सरकार मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देणार आहे, आपली भूमिका काय असणार, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मंडल आयोगाप्रमाणे मुस्लिम समाजातील जवळपास ८० टक्के वेगवेगळ्या गरीब जातींना आरक्षण मिळते आहे. तसेच आणखी काही जातींना आरक्षण मिळणार असेल तर द्यायला हरकत नाही. महाविकास आघाडी सरकारचे त्यांनी त्याबाबत समर्थन केले.

मुस्लिम आरक्षणावरून महाआघाडीत विसंवाद असल्याचे उघड