राजकारणातली मोठी बातमी; बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार?

Balasaheb Thorat

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही मतभेद पाहायला मिळत आहे . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसमध्ये नुकतेच मुंबईचे शहर अध्यक्षपद बदलण्यात आले आहे. भाई जगताप यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष ही बदलण्याबाबत काँग्रेसमध्ये हालचाल सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीत जाणार असल्याची माहिती आहे.

थोरात यांच्याकडे महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ गट नेते तसच प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे कदाचित थोरात प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. बाळासाहेब थोरात आज दिल्लीत काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसमवेत याबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, त्याआधी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली आहे. मात्र, चर्चा नेमकी काय झाली याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER