प्रदेशाध्यक्ष बदलाचे गुऱ्हाळ लांबल्याने बाळासाहेब थोरात नाराज

Balasaheb Thorat sad

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे पण निर्णय होत नाही. यावर विद्यमान अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तातडीने घ्या, असे म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.

थोरात म्हणालेत, एकंदर वर्षभरात काय कामं झाली. पुढचे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे, या निवडणुकीत पक्ष कसा सामोरा जाईल याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. अध्यक्षपदाचा घोळ फार काळ हे चालणे योग्य नाही, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी तातडीने घ्यावा.

श्रेष्ठींना वाटत असेल प्रदेशाध्यक्ष वेगळा असावा, एकाच व्यक्तीकडे दोन्ही जबाबदारी नको तर तशी संधी एखाद्या तरुण नेतृत्वाला द्यावी. काहीही वाटत असले तरी शेवटी निर्णय घेणारे श्रेष्ठ आहेत. एका पक्षाचे सरकार असले तरीसुद्धा अंतर्गत प्रश्न असतात इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. कमी कालखंडात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER