उद्धव ठाकरेंनी नेतृत्व कसं करायचं हे दाखवून दिले – बाळासाहेब थोरातांची स्तुतीसुमने

Shivsena-Thorat

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता पाहण्यासाठी आयएएनएस आणि सी वोटर्सकडून संयुक्तरित्या एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहे . यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी समाधान व्यक्त करत उद्धव ठाकरेंच्या कामकाज करण्याच्या एकूण शैलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

ही बातमी पण वाचा:- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश हे ‘मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे’ – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार सर्व सामान्य व्यक्तीवर लक्ष केंद्रीत करणारं आहे. वेगवेगळी विचारधारा एकत्र आलेल्या आहेत. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचे यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत, असे थोरात यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमधील समावेश होणं निश्चित महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे तशी अभिमानाची बाब मंत्रिमंडळआतील सहकारी म्हणून आमच्यासाठी देखील आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व कसे करावे हे सगळ्यांना दाखवून दिलं आहे. हे तीन पक्षांसाचे सरकार आहे. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सरकारचे उत्तम नेतृत्व करत आहेत, अशा शब्दात थोरातांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER