अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून थोरातांची सारवासारव

Ashok Chavhan-Balasaheb Thorat

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंगळवारी सारवासारव केली आहे.

महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी आज एक ट्विटही केले आहे. महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नसून, अशोक चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधावरच चालेल, असा दावाही बाळासाहेब थोरात यांनी या ट्विटमध्ये केला आहे.

दरम्यान, घटनाबाह्य काम करणार नसल्याचे शिवसेनेकडून लिहून घेतले आहे. शिवसेनेने उद्देशिकेबाहेर काम केल्यास, आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण नांदेडमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात म्हणाले होते. चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून सध्या महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे.

चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावरून सरकारमधील मतभेद उघड; राष्ट्रवादीने केली जहरी टीका