बाळासाहेब थोरात आणि शरद पवारांमध्ये भेट, महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती

Balasaheb Thorat - Sharad Pawar

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाच्या (Corona) स्थितीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. अशातच आज काँग्रेसचे (Congress) नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्या असल्याने ते सध्या घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेण्यासाठी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेतली, अशी माहिती थोरात यांनी दिली.

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये मोठ्याप्रमाणात साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र साखरेची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांवर आणि कारखानदारांवर परिणामझाला आहे. खरीप हंगाम येत आहे. मान्सून पीक पुढच्यावर्षी कसा राहील, पाण्याचा साठा यावर चर्चा करण्यात आली. त्यांनी कोरोनाच्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. कृषी कायदा केंद्र सरकारने केला आहे. अद्यापही त्याला विरोध होत असून यावरही चर्चा झाली. बदल हवेत यावरही चर्चा झाली. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र विक्री होत नसल्याने कृषी कर्जाच्या मर्यादा वाढवाव्यात आणि हे केंद्राकडे अखत्यारीत प्रश्न आहेत. अशा विषयांचे राजकारण करायचं नसतं त्यामध्ये हा विषय आहे.

भारतीय जनता पक्षाचा (BJP) कालखंडामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा केला गेला. घटनेत सुधारणा करुन तयार केला गेलेला कायदा सुप्रीम कोर्टाने मान्य केला नाही. यात आमचा दोष नाही. आम्ही मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला होता राजकारण केलं नाही. आता काय पर्याय आहे याची चर्चा आम्ही करत आहोत. यावर लवकरच मार्ग काढू त्यावेळी आम्ही एकीने मागे उभे राहिलो आता विनायक मेटे सारखे लोकं कोणीतरी सांगत म्हणून ते राजकारण करत आहेत. विनायक मेटे यांना राजकारण करायचे आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असेही थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button