झाडं तोडून स्मारक उभारू देणार नाही ; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला औरंगाबाद खंडपिठाकडून स्थगिती

औरंगाबाद : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकाचे काम औरंगाबाद खंडपीठाने सध्या तरी ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगाबादमधील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानात हे स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, यासाठी अनेक झाडांची कत्तल होईल. प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर सध्या तरी स्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती आहुजा यांनी दिले आहेत.

पर्यावरण प्रेमींनी केला विरोध –

प्रियदर्शनी उद्यानातील झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता. प्रियदर्शनी बचाव मोहीम सुरु करण्यात आली होती. याची दखल घेत न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे.

दरम्यान, प्रियदर्शनी उद्यानातील 1215 झाडे गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी याआधी जनहित याचिका दाखल केलेली होती. बांधकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते परंतु याचे पुनर्रोपण केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER