‘राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अविस्मरणीय’ – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

Neelam-Gorhe-silver-bricks

पुणे : अयोध्येत साकारत असलेल्या राम मंदिर (Ram mandir) निर्माणासाठी शिवसेनेकडून एक किलो चांदीची वीट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (Girish Mahajan) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. राम मंदिराचे पुणे येथील ट्रस्टी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडून ही वीट सुपूर्द करण्यात आली. ही चांदीची वीट दिवाळी पर्वकाळात आणि बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला म्हणजे गोवर्धनपूजेला अयोध्येतील राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज ( Swami Govinddev Giri ) यांच्याकडे सोपवण्यात आली.

“अयोध्येत होणार्‍या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे. तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. त्यात सर्वात पुढे येऊन वेळोवेळी भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या पक्षाकडून देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत”. अशा शब्दात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जागवल्या आणि चांदीच्या विटेचा स्वीकार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER