हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे बांधकाम वेगात

 १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला

Balasaheb Thackeray-samruddhi highway

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (samruddhi highway) प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून १ मे २०२२ पर्यंत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली .

यावेळी त्यांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या बांधकामाची सद्यःस्थिती दर्शवणारी ध्वनीचित्रफीत सादर केली. समृद्धी महामार्गाचे बांधकाम वेगात सुरू आहे. ७०१ किमी लांबीपैकी आतापर्यंत १५२.१७ किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून शिर्डीपर्यंतचा ५२० किमी लांबीचा पट्टा १ मे २०२१ पर्यंत तर ६२३ किमी लांबीचा इगतपुरीपर्यंतचा मार्ग १ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण केला जाईल. तर संपूर्ण समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला असेल असे त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीच्या प्रवेशावर खडसेंनी संभ्रम वाढवला; पक्षाच्या बैठकीला न जाता ऑनलाईन हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER