शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला लवकरच मुहूर्त

Balasaheb Thackeray Moment memorial soon

मुंबई :- गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिवाजी पार्क महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्मारकाच्या उभारणीचा  मुहूर्त लवकरच निघणार  आहे.  या स्मारकाची सुधारित रचना अंतिम करण्यात आली असून त्यासाठी किमान १८७ कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज आहे. जुन्या आराखड्यानुसार तो खर्च ७८ कोटी रुपये होता. या कामासाठी ५ नोव्हेंबर रोजी एमएमआरडीए निविदा प्रसिद्ध  करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर, २०१५ मध्ये केली होती. त्यानंतर या स्मारकासाठी समिती नियुक्त करण्यात आली. महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील जीजामाता उद्यानातील अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले. महापौर निवास ही पुरातन वास्तू असल्याने तिला धक्का न लावता जमिनीखाली बांधकाम करण्याचा निर्णय झाला. इथे वृक्ष तोड होणार नाही असे आश्वासनही देण्यात आले. या कामासाठी सुधारित विकास आराखड्यात जमीन वापराबाबतचे आवश्यक ते बदल मंजूर झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER