उल्हासनगरात उभारण्यात येणार बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि मिनी स्टेडीयम

Dr Shrikant Shinde

ठाणे: शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक (Balasaheb Thackeray Memorial) व अद्ययावत सोयी सुविधा असलेले मिनी स्टेडीयम उल्हासनगर ४ मधील जुने व्ही.टी.सी. ग्राउंड येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) कडून रुपये २५.०० कोटी इतका निधी व उल्हासनगर महानगरपालिका हद्दीमधील उल्हासनगर ४ येथील नेताजी चौक ते कैलास कॉलनी व्हाया कुर्ला कॅम्पकडे जाणाऱ्या २ ते २.५ कि.मी. च्या रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरणासाठी २६.७८ कोटी तर उल्हासनगर ४ येथील न्यू इंग्लिश हायस्कूल, नेताजी चौक मार्गे पेट्रोल पम्प हिल लाईन पोलीस स्टेशन समोरून लाल चक्कीकडे जाणाऱ्या १ ते १.५ कि.मी. च्या रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरणासाठी २३.०० कोटी अशा प्रकारे एकूण ७४.७८ कोटी निधी मंजूर करून घेण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांना यश प्राप्त झाले आहे.

तसेच सदरच्या रस्त्यांसाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ विभानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मागणी असून त्यांच्या मागणीस यश मिळाले आहे. सबब रस्ते एमएमआरडीए प्रशासन करणार असून सदर रस्त्यांचा फायदा हा समस्त उल्हासनगर व अंबरनाथकरांना होणार आहे. उल्हासनगर मनपा महापौर लीलाबाई लक्ष्मण आशान, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे यांनी देखील सदर रस्त्यांच्या व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक व अद्ययावत सोयी सुविधांसह असलेले मिनी स्टेडीयमच्या कामासाठी मागणी केली होती, तसेच सदर कामास तांत्रिक मान्यता देऊन लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्याचे सूचना खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनास दिले आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सन १९८७ साली उल्हासनगर ४ येथे स्पोर्टस् कॉम्पलेक्स तयार करण्यात आले, तद्नंतर शिवसेनेच्या व प्रशासनाच्या माध्यमातून सन २०१६ साली सदर क्रीडांगणास हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण असे नाव देण्यात आले. उल्हासनगर शहरात भव्य हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व अद्ययावत सोयी सुविधा असलेले मिनी स्टेडीयम उभारण्याकरिता कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे एमएमआरडीए कडे सातत्याने पाठपुरावा करीत होते त्यास सकारात्मक प्रतिसाद देत एमएमआरडीए प्रशासनाने मंजुरी दिली असून सदर स्मारक व अद्यायावत स्टेडीयमसाठी अतिरिक्त एकूण २५.०० कोटी इतका निधी जाहीर केला आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक व अद्ययावत सोयी सुविधांसह असलेले मिनी स्टेडीयम उभारण्याकरिता रुपये १२.०० कोटी उल्हासनगर महापालिकेने, रुपये १०.०० कोटी निधी नगरोत्थान विभागाकडून मंजूर करण्यात आलेला होता. माहे मार्च २०२० मध्ये सदर कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी रु. २२.०० कोटी मंजुर झालेला असून सदर स्टेडीयम व स्मारक उभारण्याकरिता एकूण रु. ४७.०० कोटीची आवश्यकता होती, हि बाब स्थानिक प्रशासनाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यास खासदार डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीए विभागाकडून अतिरिक्त २५.०० कोटी निधी मंजूर करून घेतला आहे, तसेच सदरच्या कामास तांत्रिक मान्यता देऊन लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्याचे सूचना खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनास दिले असून लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सांगितले.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक व अद्ययावत सेवा असलेले सोयी सुविधा असलेले स्टेडीयम उभारण्याकरिता महापालिकेने ठराव मंजूर केला असून यासाठी खासदार डॉ. शिंदे हे वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते, उल्हासनगर मनपा क्षेत्रातील व्ही.टी.सी. ग्राउंड हे १९८७ पासूनचा असून तेथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण अस्तित्वात असून त्याचे रुपांतर आता स्टेडीयममध्ये होणार आहे. तसेच उभारण्यात येणाऱ्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्टेडीयममध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व त्यास लागून मिनी प्रेक्षागृह त्यामध्ये शिवसेनेचा संपूर्ण इतिहास व बाळासाहेबांचा प्रवास त्यांचे व्यंगचित्रांचे प्रदर्शन व बाळासाहेबांविषयी माहिती, त्यांचे मार्मिक, साहित्य संग्रालय, उपहारगृह उभारणार आहे.

तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल हे ६०७२ चौ.मी. क्षेत्रफळाचे क्रीडा संकुल असून तेथे स्थानिक खेळाडूंना प्रोस्ताहन देण्यासाठी व शहरातील नागरिकांसाठी खेळाचे मैदान तयार करणार आहे. त्यामध्ये होली बॉल, फुटबॉल कोर्ट, बास्केट बॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, ४०० मीटर धावपट्टी, स्विमिंगपूल, बगीचा व एम्पी थिएटर तयार करणार असल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली. सदर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी व स्टेडीयम उभारण्याकरिता निधी मंजूर केल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे सोबतच एमएमआरडीए प्रशासनाचे व संबधितांचे आभार मानले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button