बाळासाहेबांनी युती केली नसती तर…, संजय राऊतांचा भाजपला टोला

बाळासाहेब ठाकरे शतकातून एकदाच घडतात - संजय राऊत

Sanjay Raut-BJP-Balasaheb Thorat

मुंबई :  आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची 95 वी जयंती आहे. राज्यभरातून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टी ते सर्व राजकीय स्तरातून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. आज शिवसेनेसाठी उत्सवाचा दिवस आहे. या दिवसाच्शिया औचित्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

बाळासाहेब ठाकरे शतकातून एकदाच घडतात. आज हिंदुत्वाची जी लाट निर्माण झाली आहे, त्याचे श्रेय बाळासाहेबांनाच जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याचं बळ दिलं. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले. असे राऊत यांनी सांगितले.

तेव्हा राऊत यांनी भाजपला (BJP) चिमटेदेखील काढले. भाजपचा राज्यभर झालेला विस्तार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे. भाजपला गावागावात पोहोचवण्यात बाळासाहेबांचा मोठा वाटा आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

तसेच, संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी भाजपचे अस्तित्व नव्हते. युती केल्यानंतर शिवसेनेसोबत भाजपचाही प्रचार झाला. त्यामुळे भाजप गावागावात पोहोचला. बाळासाहेबांनी युती केली नसती तर आज भाजप ग्रमीण भागापर्यंत वाढला नसता,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच हे सत्य भाजपचे नेतेही स्वीकारतील असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER