बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता – शरद पवार

Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई :- ओबीसी असो किंवा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटल्याने त्यावरून अनेक वावड्या उठवण्यात आल्या होत्या. त्याचं खंडन करत शरद पवारांनी शिवसेनेचे गोडवे गायले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, अशा वावड्या उठवण्यात आल्या. त्यानंतर अनेक जण शंका उपस्थित करू लागले. पण हे लोक वेगळ्याच नंदनवनात राहतात. शिवसेनेसोबत आपण काम कधी केलं नाही. महाराष्ट्र शिवसेनेला खूप वर्षांपासून पाहात आहे. माझ्या पूर्वीच्या अनुभवानुसार, हा विश्वासाचा पक्ष आहे, असं शरद पवार म्हणाले.

यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत किस्सा सांगितला. ‘जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना हा पक्ष पुढे सरसावला होता. तो नुसता पुढे आला नाही तर धोरणात्मक निर्णय घेत इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी पक्षाचा एकही उमेदवार उभा केला नाही. विधानसभा निवडणुकीत एखादा पक्ष उमेदवारच उभा करणार नाही, यापेक्षा मोठा निर्णय काय असू शकतो. त्याची चिंता बाळासाहेबांनी केली नाही. इंदिरा गांधी (Indhira Gandhi) यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला. हा इतिहास काही विसरता येणार नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेत असतील तर शिवसेनेनं त्या कालखंडात भूमिका घेतली होती ती पाहता, काही जण शंका उपस्थित करत असतील तर ते वेगळ्या वळणाचे आहे, हे सरकार पाच वर्षे टिकेल.’ असं पवारांनी ठणकावून सांगितलं.

तुमच्यामागे जो सामान्य माणूस आहे त्याच्याशी बांधिलकी जपा. सत्ता गेल्यानंतर आपले अनेक सहकारी पक्ष सोडून गेले; पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही गरजेची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता ही गरजेची असते. लाखांच्या संख्येनं आपण जमलो आणि शिवाजी पार्कवर जमलो आणि महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) निर्णय घेतला. हा निर्णय संपूर्ण जनतेने स्वीकारला, असंही पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीची वाटचाल योग्य मार्गाने, २०२४मध्ये मोठा पक्ष म्हणून उदयास येणार – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button